मनसे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीला

Foto
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी गीफ्तगू केले. येत्या ९ ऑगस्ट रोजी इव्हीएमच्या विरोधात मनसे आंदोलन करणार असून, त्या पार्श्‍वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे. 

राज ठाकरे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तसेच पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेणार असल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीत भाजपने इव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोपकरून काँग्रेस, राष्ट्रवादी, तेलगू देसमसह अन्य विरोधी पक्षांनी यापुढील सर्व निवडणुकांमध्ये मतपत्रिकांचा वापर करावा, अशी मागणी निवडणूक आयोगाने केली आहे. इव्हीएम घालवा आणि बॅलेट पेपर परत आणा, ही राज ठाकरे यांची भूमिका आहे. ९ ऑगस्टला ते इव्हीएमविरोधात मैदानात उतरणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्‍लीत जाऊन मुख्य निवडणूक आयुक्‍तांची भेट घेऊन इव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्या, अशी मागणी केली होती. त्याच पार्श्‍वभूमीवर ९ ऑगस्टला आंदोलन होणार असून, त्याची तयारी आता राज ठाकरे यांनी सुरू केल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. ही निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात येणार नसेल तर निवडणुकीवर बहिष्कार टाकू, अशी भूमिका राज यांनी यापूर्वीच जाहीर केली आहे. काल पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बॅलेट पेपरवर निवडणूक नसेल तर बहिष्कार ही राज ठाकरेंची भूमिका आपल्याला मान्य नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली? ते समजू शकले नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker